Tomato Price टोमॅटोचा भाव का वाढतोय? किती दिवस लागतील भाव आवाक्यात येण्यासाठी; संपूर्ण माहिती जाणून घ्या.

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Tomato Price टोमॅटोचा भाव का वाढतोय? व किती दिवस लागतील भाव आवाक्यात येण्यासाठी या बद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत मागील काही दिवसात आपण संतप्त शेतकऱ्यांनी बाजारात टोमॅटो टाकून निषेध केल्याची बातमी ऐकली असेल. पण त्यानंतर असं काय झालं ज्यामुळे टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आज टोमॅटोच्या भावामध्ये 700% पेक्षा जास्त ची वाढ झालेली आहे व भाव 140 च्या पुढे गेला व त्यानंतर दररोज टोमॅटोच्या च्या भावात विक्रमी वाढ होत असताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.

टोमॅटोचा भाव का वाढतोय?

Tomato Price मागील काही काळात 5-10 रुपये किलोने जाणारा टोमॅटो अचानक 130-140 पुढे कसं काय गेला. टोमॅटोच्या किमतीतील ही भाववाढ हंगामी असल्याचे सांगितले जाते. तसेच उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी भरपूर पाऊस झाल्याने यात टोमॅटो पिकाची नासाडी झाली त्यामुळे टोमॅटोचे भाव वाढले. तसेच महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने टोमॅटोचे भाव वाढले असं देखील सांगितलं जात आहे.

किती दिवस लागतील भाव आवाक्यात येण्यासाठी?

Tomato Price मागील काही दिवसात पहिल्या पावसात टोमॅटोच्या रोपाची ची लागवड करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानंतर पुढील पंधरा-वीस दिवसात ती रोपे शेतात लावली जातील. व त्यानंतर पुढील दीड ते दोन महिन्यात त्यांना टोमॅटो लागतील ते टोमॅटो जेव्हा बाजारात येथील तेव्हा टोमॅटोच्या किमती सामान्य होतील असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता टोमॅटोच्या किमती सामान्य होण्यास दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. असं तज्ञ सांगत आहेत