Swanandi Tikekar स्वानंदीचा गुपचुप साखरपुडा उरकण्याचा प्लॅन फसला? मेहंदीचा रोमँटीक फोटो व्हायरल

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Swanandi Tikekar Engagement Mehendi News: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्वानंदीने अगदी काहीच दिवसांपुर्वी ती रिलेशनशीपमध्ये असल्याचा जाहीर खुलासा केला. आता स्वानंदीने गुपचुप साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलंय. स्वानंदीने सोशल मिडीयावर बॉयफ्रेंड आशिष कुलकर्णी सोबत फोटो पोस्ट केलाय. यात स्वानंदीच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसतेय. (swanandi tikekar mehendi engagement photo)

काय आहे मेहंदीचा फोटो? स्वानंदी टिकेकर आणि तिचा बॉयफ्रेंडने शुक्रवारी रात्री एक फोटो शेअर केलाय. यात स्वानंदीच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसतेय. तर स्वानंदीचा बॉयफ्रेंड तिच्या गालावर किस घेताना दिसतोय.स्वानंदी आणि आशिषचा हा फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झालाय. या फोटोखाली स्वानंदीने #Engagement #Mehandi असा हॅशटॅग वापरलाय. हा फोटो पाहून स्वानंदीने आशिष सोबत गुपचुप साखरपुडा उरकलाय का? अशा चर्चा रंगल्या आहेत.

कोण आहे स्वानंदीचा बॉयफ्रेंड?स्वानंदीच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे आशिष कुलकर्णी. This is US! असं लिहून #आमचं ठरलंय असा हॅशटॅग स्वानंदीने वापरलाय. आशीष कुलकर्णी हा संगीतकार आहे.आशिष कुलकर्षी हा गायक – संगीतकार आहे. तो इंडीयन आयडॉल 12 व्या सीझनमध्ये सहभागी होता. आशिष कुलकर्णी स्वत:चे लाईव्ह शोज सुद्धा करत असतो. आशिष आणि स्वानंदी हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याने त्यांच्या फॅन्सना आनंद झालाय.