Rain Update : मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस! काही भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Mumbai Rain Update : मुंबईत मागील काही तासापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.

मुंबई : मुंबई आणि आसपासच्या भागात पावसाची गेल्या काही तासांपासून संततधार चालूच आहे. हवामान विभागाने मुंबई रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत व आसपासच्या भागात संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईत मध्येच पावसाचा जोर वाढत असल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे. पावसाचा जोर पाहता आता सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. अजूनतरी रेल्वे वाहतुकीवर काहीच परिणाम झाल्याचं वृत्त नाही. पण काही ठिकाणी रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याचं दिसत आहे.