Nitin Desai Death : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची एन डी स्टुडिओमध्ये आत्महत्या

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Nitin Desai Passed Away लगान, अजिंठा, हम दिल दे चुके सनम, फर्जंद, जोधा अकबर अश्या अनेक चित्रपटात आपल्या कलादिग्दर्शनाची वेगळी छाप देऊन प्रसिद्ध झालेले नितीन चंद्रकांत देसाई यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. नितीन देसाई यांनी त्याच्या एन डी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली आहे.

नितीन देसाई यांच्या आत्महतेच कारण आद्यप स्पष्ट झाले नाही पण त्याच्या जाण्याने चित्रपटसृष्टी वर मोठी शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मागील काही दशकापासून हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत त्यानी आपल्या कारकिर्दीने अनेकांचे लक्ष वेधले होते. 1987 पासून चित्रपटसाठी कलादिग्दर्शनाचं काम चालू केल. 2005 मध्ये कर्जत मध्ये त्यानी एन डी स्टुडिओ उभारला याच स्टुडिओ मध्ये त्यानी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.