Manoj jarange patil Biography; मनोज जरांगे पाटील माहिती

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Manoj jarange patil Biography मागच्या काही दिवसापासून मराठा समजाच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून मनोज जरांगे पाटील हे नाव समोर येत आहे. त्यांनी शांत झालेले हे आंदोलन काहिदिवसातच पुन्हा राज्यभर पसरवले. कधीकाळी उदरनिर्वाहासाठी हॉटेलमध्ये काम करणारे तसेच आंदोलनासाठी आपली जमीन विकणारे मनोज जरांगे पाटील यांची माहिती (Biography) आज आपण पाहणार आहोत.

नावमनोज जरांगे पाटील
गावअंबड जालना
मूळ गावमातोरे बीड
शिक्षण१२वी
संघटनाशिवबा संघटना स्था.२०११
Manoj jarange patil Biography

Manoj jarange patil Biography मनोज जरांगे पाटील यांची परिस्थी हलकीचीच आहे. पण त्यानी मराठा समाजासाठी स्वत:ला झोकून दिलं आहे. त्यांच्याकडे एकूण चार एकर जमीन होती. त्यापैकी दोन एकर जमीन त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनासाठी विकल्याची माहिती स्थानीकान कडून मिळते. उदरनिर्वाासाठी त्यांनी काही काळ हॉटेलमध्ये काम केले आहे. २०११ मध्ये शिवबा या संघटनेची स्थापना करून मनोज जरांगे पाटील यांनी ३० हून अधिक आंदोलने केली आहेत. कोपर्डी येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मनोज जरांगे यांनी मोठं आंदोलन केलं होतं. या प्रकरणातील आरोपींना मारहाण झाली होती, मारहाण करणाऱ्यांमध्ये जरांगे पाटील समर्थकांचे नाव आले होते.