Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; 9 जण मृत्यूमुखी

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारात नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे.

इंफाळ, 14 जून : मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारात नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. तर दहा जण जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मणिपूरच्या खमेनलोक परिसरात मंगळवारी रात्री उशीरा गोळीबाराची घटना घडली. या घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी इंफाळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यता आलं आहे.

 

या घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिक्षक शिवकांत सिंह यांनी सांगितलं की, या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांचं शवविच्छेदन करण्यात येत आहे. त्यानंतरच त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती समोर येईल.