Myanmar Military Attacks म्यानमारमध्ये हवाई हल्ल्यात चिमुकल्यासह १०० जणांचा मृत्यू

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Myanmar Military Attacks म्यानमारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवारी मध्य म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 100 जणांना जीव गमवावा लागला आहे. लष्करी राजवटीचा निषेध करण्यासाठी येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते. दरम्यान या दुर्घटनेमध्ये लहान मुलं व इतर शंभर लोकांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 8 वाजता या ठिकाणी 150 लोक सभेसाठी जमले होते. लष्कराने त्या ठिकाणी बॉम्ब फेकल्याने त्यापैकी सुमारे 100 जण ठार झाले. मृतांमध्ये विरोधी गटांच्या नेत्यांचाही समावेश आहे.