केरळ मधील कोझीकोड येथे चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांने लावली सहप्रवाशाला आग; 8 गंभीर जखमी

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

केरळमधील कोझिकोडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यावरून झालेल्या वादामुळे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पेटवून दिले रविवारी रात्री ९.४५ च्या दरम्यान अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस ट्रेन कोझिकोड शहर सोडल्यानंतर कोरापुझा रेल्वे पुलावर आली असता एका अज्ञात व्यक्तीने सहप्रवाशावर प्राणघातक हल्ला केला आणि त्यावर ज्वलनशील द्रव टाकून आग लावली त्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले प्रवाशांनी आपत्कालीन चेन ओढल्यामुळे ट्रेनचा वेग कमी झाला त्यामुळे आरोपीने तेथून पळ काढल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहे

प्रवाशांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तुरंत या घटनेची माहिती आरपीएफला दिली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्तींमध्ये झालेल्या भांडणानंतर ही घडलेली घटना आहे.